टेबलावरील कागदांचा पसारा आवरता आवरत नव्हता. काही आजची कामे आजच उरकली होती. तर काही कामे आठवड्यांपासुन टेबलावरच होती. उद्या सगळे व्यवस्थित करेन असा मनाशीच निश्चय करत सगळी कागदं , फाईली आवरत कपाटात ठेवत होतो. घड्याळात आता पावणे पाच वाजत आले होते. सगळे सहकारी आपआपला पसारा आवरुन बसस्टॉप कडे जाण्याच्या तयारीत होते. सरकारी नोकरी जॉईन आणि टाईम टू टाईम घरी जाईंग असे सगळ्यांचे समीकरण बनले होते. (मी सुध्दा) जवळपास दोन वर्षे झाली असतील पण एकही सहकारी मित्र म्हणुन बनला नव्हता. म्हणायला सगळे मित्र होते.पण फक्त 11 ते 5 या वेळेत. बाकी कुणाच्या आयुष्यात काय चालले आहे ? याची कोणाला खबरही नव्हती आणि जाणुन घेण्याची इच्छाही नव्हती. झालेच तर बळजबरी एखादे गीफ्ट घेऊन एखाद्या सहका-याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या वाढदिवसाला जाणे-येणे एवढाच काय तो संबंध. विचार करता करता जवळपास सगळे महत्वाचे कागद व फायली कपाटात ठेवल्या घड्याळाकडे नजर फिरवली .. सव्वापाच .. बापरे बस सुटली वाटत .... धावत धावत ऑफिसबाहेर आलो . धावताना काहीतरी उणे वाटत होते .. रिकाम्या हातांची जाणीव झाली आणि बॅगेची आठवण झाली. मग काय बॅक टू पव्हेलीयन, पुन्हा धावत धावत आत गेलो बॅग घेतली आणि धापा टाकत टाकत बाहेर आलो. गडुघ्यावर हात ठेवुन ओणवा होऊन थोडा श्वास घेतला आणि आता ब-याच लांब गेलेल्या बसचा लाल रंग पाहात सरळ उभा राहीलो.
तसं बस चुकण्याची ही माझी पहिलीच वेळ नव्हती. पण तरीही एकाही सहका-याला मी बसमध्ये नसल्याची जाणीव होऊ नये का? कशी होईल म्हणा? आम्ही मित्र थोडीच होतो. एकाच कार्यालयात काम केल्याने सहकारी व्यक्ती मित्र होतोच असे नाही ना. आम्ही तर फक्त समायोजित मित्रत्वाचा बुरखा घालुन 11 ते 5 पर्यंत सहकारी पणाचा अाव आणणारे व नोकरीच्या एकमात्र निमीत्ताने एकत्र आलेले गृहस्थ होतो. पण मला आता मात्र या ढोंगीपणाचा वीट येऊ लागलाय. रोज सकाळी कार्यालयात जायचे आणि एकमेकांना तोंड भरुन इंग्रजीत गुड मॉर्निंग करायचे ते थेट दुपारी काय आणलंय डब्याला? आणि मग संध्याकाळी बसच्या घाईत बोलणे नाही की चालणे नाही. असे कुठे मित्र बनतात का?
आता रस्त्यावरचे बारीक बारीक खडे ठोकरेनी उडवत रिक्षा स्टॅंड कडे निघालो. कॉलेजचे वेळी खरी अनुभवली मैत्री, सगळे जीवाला जीव देणारे मित्र होते. आमचा गृपच होता... विचारांच्या ओघात स्टॅड जवळ पोहोचलो. नेमका ओळखीचा रिक्षावाला नंबरवर होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत मागच्या सीटवर बसता बसताच बोललो- चल बाबा आज परत बस चुकली. त्यानेही हसत हसत काहीतरी विनोद करत (ज्याकडे माझे लक्षच नव्हते तरीही उसने हसु आणले) रिक्षाचा दांडा ओढला. भूर्रर्र , भूर्रर्र रिक्षा चालु झाली. संध्याकाळचा हवेतील हवाहवासा वाटावा असा गारवा चेह-यावरुन हात फिरवत होता. चालुन चालुन दमलेला जीवाला हायसे वाटले. तरीही मन खीन्नच होते. चेह-यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. जीवनात काहीतरी कमी असल्याची जाणीव माझेच मन मला करुन देत होते.
क्रमश:

No comments:
Post a Comment