Payvaat
Thursday, 4 January 2018
Monday, 6 November 2017
मला नको चहा, म्हणुन एकच सांगीतला ग मी ! मला नकोय तू घे. पण तु नाही , तर मी पण नाही म्हणत .. आलेला चहा तसाच गार व्हायला ठेऊन ती माझ्याकडे बघत बसली. तीच्या पापणीच्या खालुन गेलेली काजळाची बारीक धार, तीच्या डोळ्याच्या कडेला अगदी भुवईच्या टोकाजवळ लघुकोन करत होती. जणु काही , धनुष्यावर बाण लावुन कोणी मारण्याच्या तयारीत तो ओढुन धरला असावा. म्हणुनच तीची नजर अशी घायाळ करत असावी बहुतेक. ती तशीच बघतेय माझ्याकडे ... एकटक ... पापणीही न लवता ... नेहमीही तशीच बघत असते. तीला माझ्या कमी बोलण्याच्या सवयीचा काही फरक पडत नाही. मी बोललो , नाही बोललो तरी ती तशीच बघते माझ्याकडे एकटक ... पापणीही न लवता... यापुढेही तशीच बघत राहील ती , मला खात्री आहे. तीला आवडतो मी, असे ती नेहमीच म्हणते. म्हणजे तीने तसं नाही सांगीतलं, तरी ते समजतच मला. तीला माझ्याकडुन कसल्याही आश्वासनाची गरज नाही. तीला जणु सगळा विश्वासच आहे. ती विचारत नाही मला की, हेच का ? ती सांगत नाही मला हे नको! ती कधीच तक्रार करत नाही. जणु मी एकशे एक टक्के संपुर्ण आहे तीच्यासाठी. तीच्या डोळ्यांत तर तोच भाव दिसतो मला. कारण ती तशीच बघतेय माझ्याकडे ... एकटक ... पापणीही न लवता ...
Subscribe to:
Posts (Atom)

-
मला नको चहा, म्हणुन एकच सांगीतला ग मी ! मला नकोय तू घे. पण तु नाही , तर मी पण नाही म्हणत .. आलेला चहा तसाच गार व्हायला ठेऊन ती माझ्य...